गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

हिपरगा माळ येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोरे मनोहर

किनाळा :- हिपरगा माळ तालुका बिलोली येथील
येथील शेतकरी योगेश गणपतराव डाकोरे वय( 40 ) वर्षे यांनी सततच्या शेतातील नापीकीमुळे व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून स्वतःच्या घरातील तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.23 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की हिपरगा माळ येथील शेतकरी योगेश गणपतराव डाकोरे वय( 40 ) वर्षे हे अल्पभूधारक शेतकरी असून गत वर्षी मुलीचे लग्न करून कर्ज बाजारी झाले व त्यातदुबार पेरणीचे संकट व दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक याही वर्षी हाती लागणार की नाही अशी भीती मनात असलेल्या शेतकऱ्यांची शेतातील पिकांची सततची होणारी नापीकी होत असल्याने ज्यांच्या कडून पैसे घेतले त्यांना परत कसे देणार , त्यांच्याकडून घेतलेले पैसे नाही दिलेतर माझ्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाला व लेकरांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा व लोकांना कोण्या तोंडाने पैसे मागावे आणि जर कोणी दिले तर त्यांना परत कसे द्यायचे अशा विचारातच महिन्यात दुबार पेरणी करुनही निसर्गाच्या कधी कमी तर कधी जास्त होत असलेल्या पावसामुळे शेतातील पिक वाया जात असल्याने सततच्या नापिकी व असलेल्या कर्जाला कंटाळून दि 23 जुलै रोजी राहत्या घरी तुळईला साडीने फाशी घेउन आत्महत्या केले.

या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन त्यांच्या या अकाली निधनामुळे गावभर शकळा पसरली असून त्यांचा शोकाकुल वातावरणात 24 जुलै रोजी हिप्परगा माळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker