गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

ताराबाई डोणगावकर यांचे निधन…

मोरे मनोहर

किनाळा :- येथून जवळच असलेल्या डोनगाव खुर्द तालुका बिलोली येथील धार्मिक वृत्तीच्या सुस्वाभावी असलेल्या ताराबाई शंकरराव डोणगावकर यांचे अल्पशा आजाराने दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांचा डोणगाव खुर्द येथे 30 जुलै रोजी दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई डोणगावकर यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली नातू नाती असा मोठा परिवार असून त्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शंकरनगर येथील मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार शंकरराव डोणगावकर यांच्या त्या धर्मपत्नी होत्या.

त्यांच्या या अंत्यविधीस नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर पाटील भिलवंडे, नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बर्गे, नायगाव तालुका परत पत्रकार संघाचे माजी तालुका उपाध्यक्ष मोरे मनोहर, शंकर नगर पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.निवृत्ती भागवत, शंकरनगर येथील पत्रकार शेषराव कंधारे, यशवंत मोरे, अशोक पाटील जाधव, ज्ञानेश्वर पाटील तोडे, आनंद पाटील डाकोरे, सत्तार इनामदार, गंगाधर कांबळे आधी सह परिसरातील नागरिक संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker