सिटी इंडिया न्यूज वर्धापन दिनानिमित्त ओमकार पोतलवाड यांचा सन्मान

New Bharat Times नेटवर्क
पुणे :- सिटी इंडिया न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त कोलंबी (ता. नायगाव) येथील युवा पत्रकार ओमकार पोतलवाड कोलंबीकर यांना त्यांच्या प्रेरणादायी पत्रकारितेच्या कार्यासाठी सौ.तृप्ती देसाई यांच्या हस्ते विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

ओमकार पोतलवाड यांनी गेल्या एक वर्षात सिटी इंडिया न्यूजच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे कार्य सातत्याने केले. त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला व विद्यार्थी यांच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या प्रसंगी तृप्ती देसाई यांनी सांगितले, “ओमकारसारखे निर्भय पत्रकार हेच समाजाच्या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक आणि सिटी इंडिया न्यूजचे संपादक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



