क्राईमताज्या बातम्यानांदेड

चोरी प्रकरणातील आरोपीकडून हस्तगत केलेली रक्कम फिर्यादी व्यापाऱ्यास कुंडलवाडी पोलिसांकडून सुपूर्द

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मैनोद्दीन शेख यांचे भुसार दुकान व अब्दुल रहीम बाबासेठ यांचे किराणा दुकान दि.३ मार्च २०२५ रोजी चोरट्यांनी फोडून नगदी रुपये चोरून नेले होते या प्रकरणी कुंडलवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्व गुन्हा दाखल करून अवघ्या चार दिवसात तपास करीत एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन आरोपी अल्पवयीन मुलांकडून ३५ हजार ३७६ रुपये नगदी रक्कम जप्त केली होती.

या चोरी प्रकरणातील नगदी रक्कम ३५ हजार ३७६ रुपये फिर्यादी मैनोद्दीन शेख व अब्दुल रहीम बाबासेठ यांना आज दि.२९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायकपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कर्मचारी पी.आर.मेडेवार, पोलीस कर्मचारी एस बी शिंदे, राजेश्वर बाबळे, युसुफ मिया शेख यांच्या उपस्थितीत भारतीय न्याय संहिता कलम १०६(३) कलमानुसार बंधपत्र आणि सुपूर्द नामाच्या आधारे फिर्यादी मैनोद्दीन शेख व अब्दुल रहीम बाबा सेठ यांना सुपूर्द करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker