गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

आळंदीच्या खदानित येवती येथील तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

मोरे मनोहर

किनाळा :- येथून जवळच असलेल्या आळंदी तालुका बिलोली येथील शिवारात असलेल्या खदानित येवती तालुका मुखेड येथील मारुती विठ्ठल पांचाळ वय वर्ष 45 या तरुणाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की येवती येथील मारुती विठ्ठल पांचाळ हा तरुण देगलूर येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते त्यामुळे ते अधून मधून दोन दिवसाला तीन दिवसाला एकदा गावाकडे येत होते मात्र ते गेल्या चार ते पाच दिवसापासून गावाकडे आलेच नव्हते याच काळात आळंदी शिवारात गावाशेजारी असलेल्या एका खदानीत सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह असल्याची खबर रामतीर्थ पोलिसांना मिळाली असता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दहा घेऊन भेटण्याचा पंचनामा केले असता सदरील तरुण हा येवती येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.

सदरील मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचे कुटुंबातील जबाबदार व्यक्तींना घटनास्थळी बोलावून घेऊन त्यांचे रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळीच बोलावून घेऊन सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर घटनास्थळावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची मयत तरुण यांची पत्नी सरुबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

आळंदी येथील शिवारात येवती येथील तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून हा तरुण आत्महत्या केला की याचा कोणी घात केला अशी चर्चा सामान्य नागरिकांतून केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker