गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

सावळी येथे ११ महिन्याचे लहान बाळ घेऊन कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड ची उपजिल्हाधिकारी क्रांती डोबे यांनी केली आपुलकीने विचारपूस

◆महिला अधिकाऱ्यातील माणुसकी आणि मातृत्वपणाचे दर्शन

कुंडलवाडी :- सावळी येथील शिखर सिद्धेश्वर येथे आज दि.२८ जुलै रोजी श्रावण सोमवार निमित्त लहान बाळ घेऊन कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड इबितवार यांची उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी आपुलकीने विचारपूस करून बाळाला जवळ घेऊन महिला अधिकाऱ्यातील माणुसकी आणि मातृत्वपणाचे या निमित्ताने दर्शन घडविले.

आजच्या काळात पुरुषांच्या सोबत महिलाही खांद्याला खांदा लाऊन आज विविध क्षेत्रात आपले कर्तव्य चोख बजावीत आहेत.यात महिलांना कर्तव्यासोबतच आपले कुटुंब ही सांभाळावे लागते. आज दि.२८ जुलै रोजी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार यानिमित्ताने सावळी येथील शिखर सिद्धेश्वर मंदिरा परिसरात बिलोली पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.याच ठिकाणी आज बिलोली च्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी शिखर सिद्धेश्वर मंदिर येथे श्रावण सोमवार निमित्त दर्शन घेण्यासाठी गेले असता दर्शन घेऊन परत येताना त्यांना परिसरात ११ महिन्याचे बाळ घेऊन महिला होमगार्ड कर्तव्यावर असल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांनी महिला होमगार्ड इबितवार यांच्या जवळ जाऊन आपुलकीने विचारपूस करीत बाळाला जवळ घेतले व महिला होमगार्ड यांच्याशी हितगुज केले. ११ महिन्याच्या बाळाला घेऊन कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड इबितवार हे कर्तव्य निभावत असताना महिला उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी त्यांची आपुलकीने केलेली विचारपूस हा मंदिर परिसरात चर्चेचा विषय ठरला. उपजिल्हाधिकारी कांती डोंबे यांनी बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत सूचना देत लहान बाळ असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी बंदोबस्तावर न पाठवता ठाण्यातच कर्तव्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी तलाठी पवन ठकरोड, आबाराव संगनोड, शंकर सावळीकर, संजय पाटील बिलोलीकर,दिपक जाधव आदीजण यावेळी उपस्थित होते. एका महिला अधिकाऱ्याने एका महिला कर्मचाऱ्यांची विचारपूस करून महिला अधिकाऱ्यातील माणुसकी आणि मातृत्वपणाचे या निमित्ताने दर्शन घडवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker