ताज्या बातम्यानांदेडबिलोली

हिप्परगा येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे आ.जितेश अंतापुरकर कडुन सांत्वन

मोरे मनोहर

किनाळा :- हिप्परगा माळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी योगेश गणपती डाकोरे यांच्या कुटुंबाची देगलूर बिलोली विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश अंतापुरकर यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन असे आमदार जितेश अंतापुरकर यांनी मयत कुटुंबीयांचे सांत्वन करत आश्वासन दिले.

हिपरगा माळ तालुका बिलोली येथील येथील शेतकरी योगेश गणपतराव डाकोरे वय( 40 ) वर्षे यांनी सततच्या शेतातील नापीकीमुळे व वाढत असलेल्या कर्जाला कंटाळून स्वतःच्या घरातील तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.23 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली हि दुःखद घटना समजताच देगलूर बिलोली विधानसभेचे विद्यमान आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी दि. 28 जुलै रोजी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या कुटुंबीयांचे सांत्वन करून मयत कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन मी तुमच्या कुटुंबासोबत आहे यासाठी शासनाकडून ही मदत मिळेल ती मिळवून देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.

यावेळी बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार मरले डि.एम साहेब, मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम, तलाठी विजय पाटील जाधव, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी हराळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक नरवाडे साहेब, सोनकांबळेसर, यासह जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड गिरीधर पाटील डाकोरे, पोलीस पाटील प्रल्हाद जाधव पाटील, सरपंच गोपीनाथ पाटील, तिरुपती पाटील डाकोरे, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker