महामार्गावरील खड्ड्यांच्या मालिकामुळे वाहणधारक त्रस्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : दमदार तर सोडाच रिमझिम पावसानेही नांदेड नरसी या ४३ किलोमीटर रस्त्याची बकाल अवस्था होते. दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या मालिकामुळे वाहणचालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. टोल भरुनही खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत असल्याने वाहण धारक संताप व्यक्त करत आहेत.

रस्त्यावर जागो जागी प्रमुख रस्त्यांवर तसेच महामार्गवर खड्ड्यांचे स्वरूप पाहायला मिळते कितेक वेळा खड्या मुळे चारचाकी वाहने हे खड्डे चुकवण्यासाठी कट मारतात त्यामुळे अपघात घडतात नायगाव तालुक्यात सलग तिनं ते चार दिवसांच्या पावसामुळे हैदराबाद महामार्गावर खडेच खडे पाहायला मिळतात. के.टी कंपणी नेहमी प्रमाणे खड्डे पडल्यावर थातुर मातुर काम करून खड्डे भुजवतात मात्र काही दिवसांतच हे खड्डे मात्र रंग दाखवतात जेणे करून पुर आल्यासारखं डांबर, गिटी, डस्टचा वापर करून पसार होतात.
के.टी. कन्स्ट्रक्शन कंपणीचे अधिकारी म्हणतात आम्ही नियमितपणे रस्ता मेंटेनन्स ठेवतो असे सांगतात पण ४३ किलोमीटर रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता मेंटेनन्स कशा प्रकारे होत आहे हे दिसून येते. नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी खाजगीकरणाचे धोरण आले पण हेच धोरण नागरिकांच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे वाहणधारकांना टोल देवूनही खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
देखभाल दुरुस्तीअभावी तब्बल ४३ किलोमीटर रस्त्याची बकाल अवस्था झाली असतानाही वाहणधारककडून सक्तीने टोल वसुली करण्यात येत आहे. एवढ्या बकाल अवस्था झालेल्या रोडवर टोल देवूनही खड्डेमय रस्त्यावरुनच खडतर प्रवास करावा लागत असल्याने वाहणधारक संताप व्यक्त करत आहेत.
खाजगीकरणातून बांधण्यात आलेल्या रस्त्याची बकाल अवस्था झालेली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी के.टी. कंपणीला साधी नोटीस देण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. परिणामी नांदेड ते नरसी दरम्यानच्या ४३ किलोमीटर रस्त्यावरुन प्रवास करतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहणधारकांच्या समस्येकडे लक्ष देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही स्वारस्य राहीलेले नाही.



