रामतीर्थ येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मोरे मनोहर
किनाळा :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती रामतीर्थ येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. रामतीर्थ तालुका बिलोली येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या प्रांगणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे बीट जमादार जांभळीकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील देगलुरे, संतोष पाटील, हनमंतराव पाटील तोडे, शेषराव पाटील रोकडे, संतोष पाटील भक्तापुरे, शिवलिंग पाटील देगलूरे, मुरलीधर पाटील देगलूरे, सुधाकर पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते हनमंत वाघमारे, मारोती वाघमारे, सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य धोंड्याबाई मारुती वाघमारे, युवा कार्यकर्ते अंकुश वाघमारे, बर्मा कांबळे, सतीश वाघमारे, चंद्रकांत संतरकर, मधुकर वाघमारे, विश्वनाथ वाघमारे, शिवाजी दावलेवार, आधी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



