ब्रम्हानंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णाना औषधी व गोमाताना खाद्या वाटप

शेषेराव कंधारे
नायगाव:- आ.जितेश अंतापुरकर यांचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते ब्रम्हानंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.६ ऑगस्ट रोजी रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत औषधी वाटप व कुलस्वामिनी गोशाळा रामतीर्थ येथे गोमातेचे खाद्य वाटप करुन एक आगळावेगळा सामज उपयोग उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

युवा नेतृत्व ब्रम्हानंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक उत्सव साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय कांबळे यांनी घेतला. या उपक्रमामुळे त्यांच्या कार्यशैलीचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या औषध वितरण उपक्रमाचे स्वागत केले आणि गरोदर मातांसाठी हे औषधोपचार उपयुक्त ठरतील असे मत येथील वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले.

ब्रम्हानंद कांबळे यांच्या सामाजिक कार्याबाबत जागरूकता निर्माण होत असून त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेल्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव पा रोकडे यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव पा.रोकडे, संतोष पा पुयड, दत्ता पा.रोकडे सुधाकर पांचाळ, गोविंद पाटील, दत्ता पा.जाधव, गौस भाई शेख, पत्रकार शेषराव कंधारे, दिगंबर पा. देगलूर, अंकुश वाघमारे, आसिफ शेख, सचिन वाघमारे, बाळू राठोड, नितीन कांबळे, नितीन कांबळे, श्रीकांत कांबळे, सुरेश गायकवाड, अजम शेख, विजय देगलूरे, स्वप्निल वाघमारे, माधव वाघमारे, जीवन कांबळे, सदानंद वाघमारे, सोनू वाघमारे सह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.



