ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडीत आज होणारा कार्यक्रम हा महायुतीचा नाही, महायुतीचा कार्यक्रम म्हणून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न…

◆भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांची प्रतिक्रिया

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरात आज दि.८ आँगस्ट २०२५ रोजी कंधार-लोहा विधानसभेचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महायुतीने केल्याचे बॅनर सोशल मीडियात व शहरातील विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.

याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ.संतकराव हंबर्डे यांना विचारणा केली असता हा कार्यक्रम महायुतीचा नसून महायुतीचा कार्यक्रम म्हणून जनतेत संभ्रम निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी दिली आहे.त्यामुळे हा कार्यक्रम महायुतीचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खा.अशोकराव चव्हाण व राष्ट्रवादीचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यातच खा. अशोकराव चव्हाण हे सध्या भाजपमध्ये असून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे सध्या राष्ट्रवादीत आहेत जिल्हा पातळीवर एकमेकावर राजकीय कूरघोडी करण्याची कोणतीही संधी दोघेही सोडत नाहीत हे यापूर्वी सुद्धा दिसून आले.

आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आज दि. ८ ऑगस्ट रोजी कुंडलवाडी येथे के.रामलू मंगल कार्यालयात पत्रकारांचा सन्मान सोहळा, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार,दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महायुतीतर्फे करण्यात आल्याचे बॅनर सोशल मीडियात व शहरातील विविध भागात लावण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणात खा.अशोकराव चव्हाण व आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे राजकीय गणित कधीही जुळले नाही. याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांना विचारणा केली असता त्यांनी हा कार्यक्रम महायुतीचा नसून हा कार्यक्रम महायुतीचा आहे म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker