ताज्या बातम्यानांदेडनायगांव

प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथे जागतीक स्तनपान सप्ताह समारोपाचे आयोजन

नायगाव:- दि.7 रोजी प्रा.आ. केंद्र मांजरम येथे जागतीक स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम दि. ०१/०७/२०२५ ते ०७/०७/२०२५ पर्यंत गरोदर स्त्रीया, स्तनदा माता व ० ते ०६ महीण्याचे बालके यांची आशा, आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देवून तपासणी करण्यात आली. गरोदर मातेला व स्तनदा मातेला आहाराचे व स्तनपानाचे महत्व समजावून सांगण्यात आले, योग्य पध्दतीने स्तनपान करणे, बाळाला पुरक आहार या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमास उदघाटक म्हणून मा.श्री संदीप माळोदे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, मा.श्री प्रवीणकुमार वानखेडे साहेब गटविकास अधिकारी नायगांव, मा.डॉ. एस.सी.पटवेकर साहेब तालुका आरोग्य अधिकारी नायगाव, मा.मुखेडकर साहेब विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्ती व परिसरातील माता व बालके यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या दरम्यान मा.मु.का.अ.जि.प. नांदेड यांच्या मार्गदर्शना नुसार महिलांसाठी हिरकणी माता पुरस्कार व बालकांसाठी बाळकृष्ण (सुपोषित बालक) पुरस्कार घोषित करुन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी मातांना स्तनपानाचे महत्व समजवण्यासाठी नाटयाचे सादरीकरण केले. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मारकवाड मॅडम यांनी स्तनपानाचे महत्व विषद करणारे गीत सादर केले.

समारोपपर भाषनामध्ये श्री संदीप माळोदे साहेब यांनी स्तनपानाचे महत्व विषद करण्या बरोबरच या पुढेही अशाच प्रकारे माता व बालकांच्या आरोग्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सुचविले तसेच केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथील सर्व आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री महेश मुखेडकर सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker