ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड

जयवर्धन भोसीकर

नांदेड : मराठी पत्रकारितेची अस्मिता आणि कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबई व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र संगनवार यांची तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त देशमुख यांच्या नेतृत्वात सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे आणि डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड महानगराध्यक्ष आणि कार्याध्यक्षाची निवड आज करण्यात आली आहे महानगर अध्यक्षपदी रवींद्र संगनवार यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल आज नूतन महानगराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा सत्कार शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. हा स्वागत सत्काराचा कार्यक्रम नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.

यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुराग पोवळे, डिजीटल मिडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार संघाचे हदगाव तालुका अध्यक्ष संजय सूर्यवंशी, डिजिटल मिडिया पत्रकार मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे, श्याम कांबळे, राजकुमार कोटलवार, डॉ.दिलीप शिंदे, नरेश दंडवते, किरण कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, कमलाकर बिरादार.

अविनाश चमकुरे, सुनील पारडे, कंथक सूर्यतळ, अशोक खिल्लारे, सुरेश काशिदे, प्रदीप घुगे, हैदर अली, अर्जुन राठोड, दीपक बाविस्कर, संघरत्न पवार, अंकुश गायकवाड, ज्ञानेश्वर लोंढे, सुमेध बनसोडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले. नूतन महानगराध्यक्ष रवींद्र संगनवार आणि कार्याध्यक्ष गजानन कानडे यांना भावी कार्यासाठी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker