ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दिल्लीत मोर्चेकऱ्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) इंडिया आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्याने खासदारांनी ठिय्या मांडला. दरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायंकाळी आय टी आय चौकात निषेध आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भुमिका घेवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याची टीका केली होती. तसेच आमच्याकडे पुरावे असून ते पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडू असेही सांगितले होते. तेच प्रेझेंटेशन राहुल गांधींनी आज, गुरुवारी केले. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेनशन देत मत चोरी कशी झाली, हे दाखवून दिले.

दरम्यान, या वेळी निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत झाली होती का असा सवाल उपस्थित करत राहुल यांनी आयोग सीसीटीव्ही फुटेज, मतदार यादी नष्ट का करू इच्छितो, असाही सवाल केला. तसेच निवडणूक आयोग भारतीय लोकशाही नष्ट करत चालला आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) इंडिया आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आहे. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्याने खासदारांनी ठिय्या मांडला. दरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चात इंडिया आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चा काढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब व इंडिया आघाडीचे इतर नेते यांना अटक करण्यात आली आहे. या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवार सायंकाळी 04 वाजता आयटीआय चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker