किनाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मोरे मनोहर
किनाळा :- प्राचेत मेडिकल फाउंडेशन व ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड आयोजित डॉक्टर दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 ऑगस्ट रोजी किनाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास डॉ .सुशील रंगदळ अस्थिरोग तज्ञ, डॉ. गौरव पुंडे हृदयविकार तज्ञ व डॉक्टर मयुरेश राम पुरकर निरो सर्जन आदिसह अनेक तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार असून या शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर हे उपस्थित राहणार आहेत तरी या शिबिरात आपले आरोग्य तपासून घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान किनाळा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्येक कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य उत्तम असेल तरच ते कुटुंब सुखी व समाधानी राहू शकते अन्यथा ज्या कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य बिघडलेले असते त्या कुटुंबात अनेक अडचणी असतात म्हणून अशा आरोग्य बिघडलेल्या नागरिकांना ग्रामीण भागात योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार मिळाले पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून किनाळा येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख विकास लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात योग्य व गरजू रुग्णांना एकही रुपया खर्च लागू न देता पूर्णपणे मोफत उपचार केला जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार जितेश अंतापुरकर हे उपस्थित राहणार आहेत तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बिलोली, नांदेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख विकास मोरे, किनारा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर, किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, उपसरपंच बालाजी पाटील भोसले व किनाळा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पत्रकार यशवंत मोरे आदिसह अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत तरी किनाळा परिसरातील सर्व जनतेने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच विठ्ठल माने व उपसरपंच बालाजी पाटील भोसले यांनी केले आहे.



