डोलारा येथील गैरकारभाराचीचौकशी करून ग्रामरोजगार सेवकाला निलंबित करण्याची मागणी…

बालासाहेब शिंदे
मारतळा :- लोहा तालुक्यातील डोलारा ग्रामपंचायत अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामरोजगार सेवक गावातील पंचायत सेवक यांना पैसे द्यावे लागत असून ज्यांनी पैसे दिले त्यांचेच काम होत आहे इतरांनी पैसे दिले नाही तर त्यांचे कामे जाणूनभुजून मागे ठेवली जात आहे त्यामुळे या गैर कारभाराची चौकशी करून संबधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे डोलारा येथील शिष्ट मंडळाने केली आहे कारवाई नाही झाल्यास दि.२० ऑगस्ट पासून उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की रोजगार हमी योजनेची विहीर, शेततळे, फळबाग लागवड,वृक्ष लागवड, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरासाठी वेगवेगळा भाव निश्चित करून येथील रोजगार सेवकाने सामान्य जनतेची लूट करून लाखो रुपये लुबाडण्याचा काम केले आहे त्यांनी आजपर्यंत मनमानी पद्धतीने काम करत असून त्यांच्या मनावर वाटेल त्याच्या कामाचा प्रस्ताव पुढे द्यायचा ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना विरोध करायचे आणि योजनेपासून वंचित ठेवायचे असे धोरण राबविले जात आहे त्यांमुळे अनेक गोरगरीब नागरिक रोजगार सेवकांच्या मनमानीला बळी पडत आहेत. रमाई घराकुलासाठी दहा दहा हजार रुपये, कोणाकडून पाच हजार रुपये, तर कोणाकडून 20 हजार रुपये असा रेट त्यांनी काढलेले आहे.
यामध्ये ग्रामसेवक मधुकर मोरे सरपंच शामगिरी ग्रामपंचायतचा सेवक नारायणगिरी व रोजगार सेवक संजय वाघमारे या सर्वांची मिलीभगत असून जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे त्यामुळे या सर्व गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर प्रकाश तारू, मिथुन वाघमारे आदीसह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.



