छावा च्या तालुकाध्यक्षपदी साईनाथ मोरे व साईनाथ जाधव यांची निवड

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आणि समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते देगावचे साईनाथ शिवाजी पा.मोरे (पूर्व), मोकासधऱ्याचे साईनाथ उद्धवराव जाधव (पश्चिम) यांची अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मेळगावचे भगवान शिवाजी शिंदे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल मोरे, जाधव व शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मोरे व जाधव यांची सामाजिक कार्याचा अनुभव आणि संघटनेतील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन, त्यांची ही निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नायगाव तालुक्यात संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल आणि युवकांचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे पाटील यांनी व्यक्त केला.
मागील दहा – अकरा वर्षापासून समाजासाठी तळमळीने आणि निःस्वार्थपणे केलेल्या कामाची पावती मिळाली. संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत, समाजाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहु, अशी भावना साई मोरे व साई जाधव यांनी निवडीनंतर व्यक्त केली. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.



