अवैध देशी दारु विकणाऱ्या लालवंडीच्या माधव इंद्रे ला पोलिसांनी केली अटक

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : पुर परिस्थिती पाहणीच्या कामासाठी निघालेल्या नायगाव पोलिसांना लालवंडी येथे अवैध देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. यावरुन नायगाव पोलिसांनी माधव जयवंता इंद्रे याच्या घरी छापा मारुन 1600 रुपयाची देशी दारुच्या बटल्या जप्त केल्या. सदरची कारवाई दि. 16 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आली. पोहेका साईनाथ सांगवीकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान पोहेका साईनाथ सांगवीकर व बाबु चरकुलवार, पोकों/ बालाजी बामणे, पोकाँ शंकर पवार अदि असे मिळुन पोलीस स्टेशन नायगांव मध्ये पुर परिस्थती संबंधाने मोटरसायकलरुन पेट्रोलींग करीता रवाना झालो. पेट्रोलींग दरम्यान वेळ अंदाजे 15.30 वाजताचे सुमारास मांजरम येथे पोहचले असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, लालवंडी येथील माधव जयवंता इंद्रे हा त्याचे राहते घरा समोरील मोकळे अंगणात पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये देशी दारु स्वतः जवळ बाळगुन तिची चोरटी विक्री करीत आहे.
खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलिसांनी दोन पंचाना बोलावून त्यांना प्रो. रेड बाबत माहिती दिली पोलीस व पंच असे मिळून माहीती मिळालेल्या ठिकाणी दबा धरुन अगोदर पाहणी केली. माहिती मिळालेला संशयित इसम माधव इंद्रे हा पांढऱ्या रंगाचे पोत्यात देशी दारुची चोरटी विक्री करीत असल्याचे दिसल्याचे दिसून आले. त्यामुळे अचानक छापा मारुन त्यास पांढऱ्या रंगाचे पोत्यासह ताब्यात घेतले.
पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव माधव जयवंता इंद्रे वय 41 वर्ष व्यवसाय शेती रा.लालवंडी ता. नायगांव जि. नांदेड असे सांगीतल्याने त्यास पांढऱ्या पोत्या मध्ये काय आहे असे विचारता त्याने देशी देशी दारु भिंगरी संत्रा असल्याचे सांगीतल्याने. त्यास दारु विक्रीचा परवाना बाबत विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने नायगाव पंचासमक्ष त्याचे ताब्यातील पांढ-या पोत्याची पाहणी केली असता देशी दारुच्या 20 बाटली आढळून आल्या. दारु विक्रेता आरोपी माधव इंद्रेला अटक करून 1600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



