कुंडलवाडी शहरात २३ वे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न

कुंडलवाडी : ग्रामदेवता महालक्ष्मी माता यांच्या २३ व्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दि. १५ ऑगस्ट सायंकाळी, रोजी कुंडलवाडी शहरात ह. भ. प. समाधान महाराज जळगावकर यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अनेक भजनी मंडळे तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय केले.
कीर्तनानंतर महाराज, भजनी मंडळी तसेच आप्तेष्ट यांच्यासाठी स्नेहभोजनाची (प्रसादाची) व्यवस्था करण्यात आली होती. हा स्नेहभोज (प्रसाद) डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार यांनी स्वतः आयोजित करून कार्यक्रम अधिक अविस्मरणीय केला.
धार्मिक कार्यात नेहमी अग्रभागी राहणारे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार हे कुंडलवाडी शहरातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुढाकारामुळे शहरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण नेहमीच बहरत असते. मित्रपरिवार व भाविकांनी एकत्रितपणे धार्मिक प्रसादाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



