ताज्या बातम्यानांदेडलोहा

लोहा तालुक्यातील कौडगाव नदीपात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल…

बालासाहेब शिंदे

मारतळा :- लोहा तालुक्यातील कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा नोंद झाला असून उस्मान नगर पोलीस पथकाने १० ब्रास वाळूसह २ क्रेन जप्त करून ४५,४२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी २ बोट चालक बोट घेऊन फरार झाले.

उस्मान नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस हवालदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पेद `वाड व होमगार्ड यांचे पथक शोध मोहिमेवर होते. २१ ऑगस्ट रोजी त्यांनी ही कारवाई केली. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती त्यानुसार पथकाने कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळीलl गोदावरी नदी पात्रातून बोटीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करणाऱ्यांवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच २ बोट चालक गोदावरी नदी पात्रातून बोटी घेऊन पळून गेले.

यावेळी पथकाने १० ब्रास वाळू (४२ हजार रुपये ), २ क्रेन (४५ लाख रुपये) असा मुद्देमाल जप्त केला. मुखेड तालुक्यातील खैरका येथील क्रेन चालक व मालक पांडुरंग गोविंद मोरे, हैदराबाद रोड धनेगाव वसरणी येथील क्रेन चालक महेश मेवालाल प्रसाद यांच्यावर कारवाई केली. उपरोक्त २ जणांवर व फरार झालेल्या २ बोट चालकांवर उस्मान नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उस्माननगर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker