कर्मयोगी बळवंतराव चव्हाण व स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी ते जयंती सेवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण व स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा (ता.२६) आँगष्ट रोजी आयोजित करण्यात आला असून. यानिमित्ताने डॉक्टर असोसिएशनच्या वतीने नायगाव शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.रवींद्र चव्हाण हे होते.
दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण व स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याची नायगाव शहरात जोरदार तयारी करण्यात येत असून अनेक दिग्गज राजकारण्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यानिमित्ताने नायगाव तालुक्यात विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येत आहेत. दोन्ही लोकनेत्यांच्या पुण्यतिथी ते जयंती चे औचित्य साधत डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी शहरातील डॉ.विश्वास चव्हाण यांच्या रूग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माजी आ.हानमंतराव पा.बेटमोगरेकर, बळवंतराव पा.बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, श्रीनिवास पा.चव्हाण, भगवानराव लगंडापुरे, मोहन देमेवार, नगरसेवक पंकज चव्हाण, डाॅ.मधुकर राठोड, डाॅ.दत्तात्रय शिपाळे, डाॅ.गुलाबरराव वडजे, डाॅ.विश्र्वास चव्हाण, डाॅ.रमेश रामशेटवार, डाॅ.राम डाकोरे, डाॅ.बिडवे कवठेकर, रमेश पा.शिंदे, डाॅ.प्रभाकर गायकवाड, डाॅ.संतोष खंडगावकर, डाॅ.शिदे, श्रीधर चव्हाण, दत्ता येवते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

डॉक्टर असोसिएशनचे समर्पित भावनेने कार्य : खा.चव्हाण
डॉक्टर असोसिएशन सेवाभाव जपत समर्पित भावनेने नायगाव शहरात क म करत आहे ही अतिशय चांगली बाब असून. अपघात असो की अडचण असो डॉक्टर असोसिएशनचे सदस्य रुग्नांच्या मदतीला धावून येतात. नायगाव शहरामध्ये एखादे मोठे मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय असावे अशी इच्छा स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांची होती ती इच्छा डॉक्टर असोसिएशन लवकरच पुर्ण करेल असा आशावाद खा.रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.



