ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मान्यवरांच्या स्वागतासाठी नायगाव नगरी सज्ज : स्व.आ.बळवंतराव चव्हाण व स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे आज अनावरण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : येथे मंगळवार दि. 26 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते हहोणार्‍या स्व.आ.बळवंतराव चव्हाण व स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून या सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी नायगाव नगरी सज्ज झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

आज नायगाव येथील श्री हनुमान मंदिर परिसरात सकाळी 11 वाजता होणार्‍या या सोहळ्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खा.छत्रपती शाहु महाराज आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती लशाभणार आहे.तसेच माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पालकमंत्री अतुल सावे,ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना.बाबासाहेब पाटील,ना.मेघनाताई बोर्डीकर,प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ह्रषवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात.

माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम,नाना पटोले,माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, ना.हेमंत पाटील, माजी मंत्री डी.पी.सावंत, अर्जून खोतकर, माजी मंत्री अब्दुल सत्तार, खा.रजनीताई पाटील, विजय वडेट्टीवार, भास्करराव पाटील खतगावकर,अमित देशमुख, वर्षाताई गायकवाड,सतेज पाटील,विश्वजित कदम, चंद्रकांत हंडोरे,प्रज्ञाताई सातव,ईश्वरराव भोसीकर, खा.सुरेश शेटकर, खा.किरण रेड्डी, खा.कल्याणराव काळे, खा.नागेश पाटील आष्टीकर,खा.शिवाजीराव काळगे, खा.प्रतिभाताई धानोरकर,खा.डॉ.अजित गोपछडे, खा.अमोल कोल्हे, खा.प्रणिती शिंदे,खा. शोभाताई बच्छाव, खा.डॉ.नामदेव किरसन, खा.बलवंत वानखेडेे, खा.श्यामकुमार बर्वे, खा.प्रशांत पडोले, खा. इमरान प्रतापगढी, खा.अमर काळे, खा.बजरंग सोनवणे, खा.संदीपानराव भुमरे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सभा स्थळी भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला असून वाहनतळ, विशेष सुरक्षा व्यवस्थेसह इतर सर्व आवश्यक त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळा यशस्वीतेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

सोहळ्यानिमित्त हनुमान मंदिर परिसरात दुपारी १ ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांचे कीर्तन होणार असून, परिसर भक्तीमय वातावरणाने निनादणार आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार रवींद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker