कुणबी जात वैधता सादर करण्यासाठी सहा महिण्याची मुदत ; अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

प्रकाश महिपाळे
नायगाव : कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे (ओबीसी) प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतू सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून असा शासन निर्णय दि. २६ आँगष्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढला. त्यामुळे अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
एसईबीसी आरक्षण अधिनियम, २०२४ राज्यात नव्याने लागू झाल्याने तसेच शा.नि. दि.०७.०९.२०२३ अन्वये मा.न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार नव्याने कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे (ओबीसी) जात प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही अद्यापही सुरू आहे.
सदर प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अलीकडच्या काळात मिळालेली आहेत पण अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेली नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश जात वैधता प्रमाणपत्रांच्या अभावी अवैध होऊ नयेत म्हणून सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षाकरीता काही कालावधीची मुदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार शासनाने दि. २६ आँगष्ट रोजी खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत.
परंतू सदर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वैधते अभावी प्रवेश रद्द होण्याची भिती असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आंदोलनाच्या धास्तीने निर्णय…
आरक्षणाच्या मुद्द्यावर मरोज जरांगे यांचे वादळ पुन्हा एकदा मुंबईकडे कुच करणार असल्याने राजकीय वातावरण तापले असून मंत्रीमंडळाती काही मंत्री जरांगे यांच्यावर एकीकडे टिकेचा सुरु वाढवला तर दुसरीकडे आंदोलनाच्या धास्तीने सहा महिणे मुदतवाढ देण्याचा तर निर्णय घेतला नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.



