ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेड जिल्ह्याने खा.रवींद्र चव्हाण यांना साथ द्यावी : खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आवाहन

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : चव्हाण कुटुंबीयांनी नेहमीच सर्वांना सोबत घेऊन सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. चव्हाण कुटुंबियांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी खा.रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. त्यांना जिल्ह्याने साथ द्यावी, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. मंगळवारी (दि. २६) नायगाव येथे आमदार (स्व.) बळवंतराव चव्हाण व खासदार (स्व.) वसंतराव चव्हाण या पिता-पुत्राच्या पुतळा अनावरण समारोहात ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.अमितभैय्या देशमुख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन कपकाळ, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, खा.रवींद्र वसंतराव चव्हाण निझामाबाद येथील माजी आमदार शब्बीर अली, आ.विश्वजीत कदम, खा.कल्याण काळे, खा.सुरेश शेटकर, खा.शिवाजीराव काळगे, खा.नागेश पाटील आष्टीकर, खा.डाॅ.अजित गोपछडे, खा.शोभा बच्छाव, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, अमरनाथ राजूरकर, आदींसह इतरही मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले, माझा आणि चव्हाण कुटुंबियांचा संबंध 1974 पासून आहे. या कुटुंबाने नेहमी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. अशा प्रकारे सर्वांना सोबत घेऊन चालले तर आपला गाव, जिल्हा व महाराष्ट्र, पर्यायाने देश विकसीत होण्यास मदत होणार आहे. यापुढे चव्हाण कुटुंबियांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी खा.रविंद्र चव्हाण यांच्यावर आहे. त्यांना जिल्ह्याने साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी आमदार. (स्व.) बळवंतराव चव्हाण व खासदार (स्व).वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

यावेळी आ.अमितभैय्या देशमुख, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, हर्षवर्धन सपकाळ यांचीही भाषणे झाली. खा. रवींद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माणिकराव ठाकरे, आ.सतेज पाटील, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.विक्रम काळे, आ.जितेश अंतापूरकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डाॅ.माधवराव पाटील किन्हाळकर, ओमप्रकाश पोकर्णा, श्यामसुंदर शिंदे, अमरनाथ राजूरकर, मोहनराव हंबर्डे, माधवराव पाटील जवळगावकर.

शंकरअणअणा धोंडगे, अविनाश घाटे, गंगाधरराव पटणे, माधवराव पाटील शेळगावकर, मारोताव कवळे, शिवराज पाटील होटाळकर, राजेश कुंटुरकर, दिलीपराव बरबडेकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, बबन बारसे, भुजंग पाटील डक, इश्वरराव भोसीकर आदी मान्यवरांसंह कार्यकर्ते, पदाधिकारी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

हा कौटुंबिक सोहळा असून ही जिल्हा परिषदेची सेटींग नाही : खा.अशोकराव चव्हाण
राजकारणात पक्ष बदलल्या जातात, विषय बदलतात, संदर्भ बदलतात, वैयक्तिक संबधही बिघडतात पण वसंतराव चव्हाण मात्र वैयक्तिक संबधात कुठेही कटूता येवू दिली नाही. मी आज भाजपमध्ये असलो तरी खा.रवींद्र चव्हाण यांनी वैयक्तिक संबध जोपासताना कुठेही पक्षीय द्रष्टीकोण येवू दिला नाही याबाबत अभिनंदन केले. या कार्यक्रमात जुने सहकारी भेटल्याने आनंद झाला. राजकीय मतभेद कुणाचेही असले तरी कौटुंबिक व वयक्तिक संबंध जोपासले पाहिजेत. आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी हा कार्यक्रम कौटुंबिक आहे त्यामुळे या कार्यक्रमातून जिल्हा परिषदेची सेटिंग नसल्याची मिश्कील टिप्पणी केली.

राहुल गांधी यांचा संदेश…
स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास आपण वचनबद्ध आहोत अशी ग्वाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. ते म्हणाले, पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश पाठविला आहे. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांचा संदेश वाचून दाखवला.

वसंतगाथा’ चे प्रकाशन…
यावेळी खा.स्व.वसंतराव चव्हाण यांच्या चरित्रावर आधारित ‘वसंतगाथा’ हा ग्रंथ छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. ग्रंथाचे संपादक संजीव कुलकर्णी यांनी मोजक्या शब्दात ग्रंथ प्रकाशनाचे औचित्य कथन केले. वसंतगाथा ग्रंथाचे संपादक संजीव कुलकर्णी, ग्रंथाची मांडणी व सुबक छपाई करणारे शिवानंद सुरकुटवार, मूर्तीकार मोरवंचीकर यांचा सत्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उस्थित करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker