ताज्या बातम्यानांदेडबिलोली

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन ; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

कुंडलवाडी :- आगामी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव शांततापूर्ण, सलोख्याच्या वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून साजरा व्हावा, या उद्देशाने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, अण्णाभाऊ साठे जयंती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना जयंती उत्सव शांततापूर्ण व बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच डीजेचा वापर टाळावा, ध्वनीप्रदूषणास प्रतिबंध करणाऱ्या नियमांचे पालन करावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद अथवा अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिले.

बैठकीत उपस्थितांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker