ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शंकरनगर परिसरातील शेकडो कार्यकर्ते आरक्षणाच्या समर्थनार्थ मुंबईकडे रवाना

मोरे मनोहर

किनाळा :- मनोज जरांगे पाटील यांनी 27 तारखेला सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेने कुछ करण्याची घोषणा केली असून मराठा आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी दहा वाजता जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघतील त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईतील आझाद मैदानात पोहोचतील आरक्षण न दिल्यास उपोषण करूच पण सरकारही उलटून टाकू असा इशारा त्यांनी दिला असून त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या समर्थनात शंकरनगर परिसरातील शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने आज 27 ऑगस्ट रोजी सकाळी रवाना झाले आहेत.

शंकरनगर परिसरातील रामतीर्थ, किनाळा, हिप्परगा माळ, बिजूर, शेळगाव गौरी, टाकळी, केरूर, अटकळी, आदमपूर, बोरगाव, कुंचेली आदिसह अनेक गावातील मराठा युवा कार्यकर्ते मनोज पाटील जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसणार असून मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला उलथुन टाकू असा इशारा दिला त्यांच्या या समर्थनात आज विविध गावात समाजाच्या बैठका घेऊन मुंबईच्या दिशेने शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker