ताज्या बातम्यानांदेडबिलोली

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी पोलीसांचे शहरात पथसंचलन

कुंडलवाडी :- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांतपणे पार पडावे व कायदा व सुव्यवस्था आबाधित राखावी
यासाठी कुंडलवाडी पोलिस स्टेशनच्यावतीने पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दि.२८ आँगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक गफुर शेख, पोहेकाँ माधव पाटील, पोहेकाँ पी.आर.मेडेवार, अमरनाथ शिंदे, रविंद्र देशमुख, रघुवीरसिंह चौहान, शिवा गंगुलवार, मिर्झा फैय्याज बेग, सुनील बास्टेवाड,व्यंकट घोंगडे,माधव वडेटवार, राजेंद्र गोणेकर महिला पोलीस कर्मचारी अरूणा श्रीवास्तव यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान या पथसंंचालनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker