ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव येथे टेंटच काम करणारा उत्तर प्रदेशातील तरुण काल गुरुवारी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहूण गेला होता. मात्र त्या तरुणाचा आज सकाळी मृतदेह सापडला आहे.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नायगाव शहरातून वाहणाऱ्या नदीला महापूर आला होता. या पुरात टेंटचे काम करणारा ता. मुज्जफूर जि. फिरोजाबाद भुरीसिंग पिता राजनाथसिंह हा (35) वर्षाचा तरुण वाहून गेला तर एकाला महानगर पालिकेच्या रेस्क्यू टिमने वाचवले होते. भुरीसिंग हा येथे मजूरीचे काम करत असल्याने त्याचे कुणीही नातेवाईक नव्हते त्यामुळे वाहून गेलेल्या तरुणाच्या बाबतीत निश्चित माहिती मिळत नव्हती तरीही सदरची माहिती जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आली होती.

महापुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी शोध सुरू करण्यात आला होता मात्र तो नजीकच्या एका झोपडीच्या लाकडात अडकून पडला होता त्यामुळे त्याचा मृतदेह सापडला आहे. सदरचा मृतदेह उतरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती बिट जमादार साईनाथ सांगवीकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker