ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी : बालाजी बच्चेवार

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव उमरी धर्माबाद बिलोली देगलूर तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे तरी सर्व नागरिकांनी स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन भाजप नेते बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

मागच्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे तीनही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर नायगाव शहरासह तालुक्यात पुर परिस्थिती गंभीर झाली असून. पुराचे पाणी घरात गेल्याने गोरगरीब नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्याचबरोबर शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले. विशेष म्हणजे नायगाव शहरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तर ग्रामीण भागातील नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे पिके पाण्यात गेली आहेत.

मानार प्रकल्प बारूळ व लिंबोटी हे दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत वरून पाऊस चालू असल्यामुळे रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे आणि यापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीत आणि प्रकल्पामध्ये पाणी मावत नसल्याने कोणत्याही क्षणी मनियाड नदीची पाणीपातळी वाढू शकते हे आपण या नदीच्या आजूबाजूच्या सर्व गावातील जनतेने आपण आपली कुटुंबाची जनावराची तसेच आपल्या शेतामध्ये जे काही शेती उपयोगी वस्तू आहेत त्या सर्व वस्तूची काळजी घेऊन लवकरात लवकर आपण सुरक्षित स्थळी राहण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker