ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शंकरनगर येथे मराठा आरक्षणाचा फटाके फोडुन जल्लोष

मोरे मनोहर

किनाळा :- मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू अस म्हणतलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाने अखेर दखल घेऊन मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण देण्यात येईल असा शासनाने आदेश दिल्यानंतर शंकरनगर परीसरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून जरांगे पाटील यांच्या मागणीला यश आल्याने ठिक ठिकाणी फटाके फोडुण जल्लोष करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे दि. 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले असताना सरकार त्यांच्या आमरण उपोषणाची दखल घेत नसल्याने सरकारला वटणीवर आणण्यासाठी लाखो मराठा समाजबांधव मुंबई मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी दाखल होत असल्यामुळे शासनाने हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मान्य करून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याचे शासनाने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मागणीला यश आले असल्याने शंकरनगर, किनाळा, हिपरगा माळ येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष करीत फटाके फोडुन जल्लोष केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker