ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना मिळणार 10 लाखाची अर्थिक मदत

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थिक मदत करण्यात येणार असून. मुख्यमंत्री सचिवालयाने काल दि. 5 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ज्या 21 लाभार्थ्यांची यादी दिली. त्यात नायगाव तालुक्यातील 6 जनांचा समावेश आहे. आत्महत्या केलेल्यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाखाची मदत मिळणार आहे.

मराठा आरक्षणाच्या दरम्यान नायगाव तालुक्यात अनेकांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना शासकीय मदत व शासन सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा मुंबईतील उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आग्रहाने उपस्थित केला होता. यावेळी शासनाने नियुक्त केलेल्या उपसमितीने तातडीने अर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार काल दि. 5 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सचिवालयाने एक पत्र जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नावे पाठवून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या नांदेड जिल्ह्यातील 21 मयतांची यादी पाठवली असून. मयताच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 कोटी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत असे सदरच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील ज्या लोकांनी आत्महत्या केली त्यापैकी नायगाव तालुक्यातील संख्या सहा आहे यात प्रकाश व्यंकटी जाधव रा.रानसुगाव, तिरुपती रामचंद्र लांडगे, रा.मांडणी, राजेश बालाजी भाकरे रा.गडगा, सम्रत हनमंत जाधव रा.केदारवडगाव, भिवजी देविदास बेलकर रा.बळेगाव व आनंदा बळवंत शिंदे रा.कोलंबी ता.नायगाव अदी आत्महत्याग्रस्तांच्या कायदेशीर वारसांना ही मदत मिळणार आहे.

मंजूर झालेली रक्कम मयतांच्या वारसांची आवश्यक ती पडताळणी करुन वाटप करण्यात यावे व अर्थसहाय्य वाटप करण्यात आल्याबाबतचा अहवाल पाठवण्यात यावा अशा सुचना मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे कक्ष अधिकारी तथा सह कक्ष प्रमुख शरद घावटे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत 15 ते 20 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण यातील केवळ 6 मयतांच्या वारसांनाच अर्थसहाय्य मिळणार आहे त्यामुळे इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश देणे आवश्यक असून त्यानुसार तालुक्यातील मयतांच्या वारसांना मदत देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker