ताज्या बातम्यानांदेडनायगांव

आता मे महिण्यात झालेल्या जिल्हा परिषदेतील इतर विभागाच्या बदल्यांचीही चौकशी करण्याची होवू लागली मागणी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांगाचा लाभ घेतलेल्या मास्तरांनी जिल्हा परिषदेमध्ये चकरा मारु लागले आहेत. पण काय कारवाई होते याच्या धास्तीने बोगस दिव्यांग मास्तरांच्या पायाखालची वाळू सरकली असताना मे महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेतील इतर विभागाच्या सार्वजनिक बदल्यामध्येही बोगस दिव्यांगांनी हात धुवून घेतल्याची चर्चा असून यात आरोग्य विभाग सर्वात पुढे असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये जिल्हापरिषदेच्या मास्तरांनी संवर्ग एकमधून सोईच्या ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी किंवा आहे त्याच ठिकाणी मदत वाढून मिळण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याबरोबरच अनेक कारनामे केले आहेत. या कारणाम्याची जिल्हाभर चर्चा झाल्यानंतर ‘मास्तर तुम्ही पण’ आता अशी जोरदार चर्चा तर होतच आहे. मास्तरांनी बदलीसाठी किती खालच्या थराला गेल्याने विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा आता याची ग्रामीण भागात पालक बोलून दाखवत आहेत.

जिल्हा परिषदेच्या मास्तरांनी बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून लाभ घेतल्या प्रकाराची झाडाझडती सुरु असतांनाच मे महिण्यात जिल्हा परिषद अंतर्गत वित्त, जलसंधारण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक वगळून, महिला बाल कल्याण, आरोग्य, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामपंचायत विभातील जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यामध्येही कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्राचा लाभ घेतला असून. यात आरोग्य विभागातील अनेकांनी सोईच्या ठिकाणी बदली करुन घेणे किंवा बदली रद्द करण्यासाठी बोगस प्रमाणपत्राचा उपयोग केला असल्याची आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

बोगस प्रमाणपत्र देवून सोईच्या ठिकाणी बदली करुन घेणे किंवा आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ मिळण्यासाठी बोगस प्रमाणपत्राचा वापर जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून करण्यात येतो. कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे अधिकाऱ्यांना माहिती असते पण बोगस प्रमाणपत्रावर अर्थिक वजन ठेवण्यात येत असल्याने ते बोगस प्रमाणपत्र जाग्यावरुन हालतच नाही. बदली प्रक्रिया सुरु झाली म्हणजे अधिकारी मालामाल होतात असाच आजपर्यंतचा शिरस्ता आहे. अंतर्गत वित्त, जलसंधारण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक वगळून, महिला बाल कल्याण, आरोग्य, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामपंचायत विभातील जिल्हांतर्गत बदल्यात अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची सोय करतांना आपलीही तुंबडी भरुन घेतली आहे.

मे महिण्यातील या बदल्यात सर्वच विभागातील कर्मचारी संवर्ग एकचा लाभ घेतांना बोगस प्रमाणपत्र वैद्यकीय कागदपत्रे सादर केली आहेतच पण पंचायत विभाग व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे त्यामुळे अंतर्गत वित्त, जलसंधारण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक वगळून, महिला बाल कल्याण, आरोग्य, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा व ग्रामपंचायत विभातील जिल्हांतर्गत बदल्याची पण चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker