ताज्या बातम्यानांदेडनायगांव

चोरीची विलायची खरेदीची व्याप्ती नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यात ; म्होरक्या नायगावचा व्यापारी

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नांदेड येथील एका व्यापाऱ्यांची जवळपास आडीच कोटीच्या विलायचीची चोरी काही दिवसांपूर्वी झाली. या प्रकरणाची गुप्त चौकशी सुरु असून चोरीचा माल नायगाव येथील मोंढ्यातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यांने खरेदी केली होती. या प्रकरणाचे बिंग फुटल्यावर मात्र संबधीत यंत्रणेचे व नांदेडच्या व्यापाऱ्यांच्या चरणावर लोटांगण घालून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नायगाव येथील याच व्यापाऱ्याने यापुर्वी बनावट रिन साबन खरेदी केली होती त्या प्रकरणातही चांगलाच दंड द्यावा लागला होता.

नायगाव येथील ज्या व्यापाऱ्याने कोटीच्या वर चोरीची विलायची लाखात खरेदी केली त्या व्यापाऱ्याच्या कुटूंबाला नायगाव पंचक्रोशीत मानाचे स्थान असताना कमी पैशात जास्त नफेखोरी मिळवण्याच्या प्रयत्नात कुटूंबीयांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असल्याची प्रतिक्रिया नायगाव शहरात व्यक्त केल्या जात आहे. दुसरीकडे त्या व्यापाऱ्यांचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली असून प्रणिष्ठीत व्यापारी असे उद्योग करत असतील तर काही खरे नाही असेही बोलल्या जात आहे.

नांदेड येथील एका बड्या व्यापाऱ्याची जवळपास आडीच कोटीच्या वर विलायचीची चोरी झाली सदर प्रकरण चौकशीवर असून गुप्त चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या गुप्त तापासानंतर या चोरीच्या प्रकरणाची व्याप्ती नायगावसह नरसी, अटकळी, उमरी व धर्माबाद तालुक्यापर्यत असल्याचे समोर आले आहे. या चोरीच्या प्रकरणाची कमालीची गुप्तता पाळण्यात येत असतांनाही नायगाव येथील त्या बड्या व्यापाऱ्याचे नाव समोर तर आलेच असून यांच्याच माध्यमातून नरसी व अटकळी येथील दोन व्यापाऱ्यांनी ही हात धुवून घेतले आहेत.

चोरीची विलायची खरेदी केल्याच्या प्रकरणात नायगाव शहरातील त्या व्यापाऱ्याचे नाव चर्चेत आल्याने खळबळ उडाली असून सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी हा व्यापारी नांदेडला जावून ज्याचा माल चोरीला गेल्या आहे त्यांच्या चरणावर लोटांगण घालून आला असून बरीच मोठी रक्कम देण्याचा शब्द दिल्याची जोरदार चर्चा नायगाव शहरात सुरु आहे. मोठी प्रतिष्ठा असलेल्या व्यापाऱ्याने यापुर्वी बनावट रिन साबण विकण्याचा गोरखधंदा केला होता ही बाब पण त्यावेळी उघड झाली होती.

त्यावेळेसही या व्यापाऱ्याने कंपणीच्या अधिकाऱ्यांना मोठा दंड देवून आपली सुटका करुन घेतली होती. यावेळी मात्र सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. कारण हाच व्यापारी चोरीची विलायची खरेदी म्होरक्या असून यांच्या माध्यमातून अनेकांनी कोट्यावधी रुपयाची चोरीची विलायची लाखात खरेदी केली असल्याची चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker