ताज्या बातम्यानांदेडनायगांव

न्याय, हक्कासाठी बरबड्यात उद्या शेतकऱ्यांचा लढा पेटणार ; प्रहार नेते बच्चू कडू यांची उपस्थिती

भगवान शेवाळे

बरबडा :- शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी, कष्टकरी मजुरांच्या घामाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी बरबड्यातून नवा लढा पेटणार असून, यासाठी बरबड्यातील शेतकऱ्यांनी जोरदार तयार केली आहे.

उद्या 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नायगाव तालुक्यातील बरबडा या ठिकाणी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून,शेतकरी पुत्र गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून हा शेतकरी मेळावा संपन्न होत आहे. बरबडा व परिसरातील अनेक शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी या लढ्यात सहभागी होत आहेत.

दरवर्षी येणारे गोदावरी बॅकवॉटरचे संकट,वर्षनिहाय पिक विमा अडचणी तसेच गावोगावी असंख्य प्रलंबित मागण्या अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत. या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ही शेतकरी परिषद आयोजित केली आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी आणि न्याय हक्कासाठी घराघरातील प्रत्येक शेतकरी बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker