नवोदय विद्यालयात दहावीच्या गुणाच्या आधारे आता विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश!

मोरे मनोहर
किनाळा :- यावर्षी दहावी 2025 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षा न घेता त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारावर अकरावी विज्ञान शाखेत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे तरी शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश घेण्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे संपर्क करावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले यांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील तालुका बिलोली येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी निवड चाचणी परीक्षा घेऊनच
अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता मात्र आता निवड चाचणी परीक्षा न घेता दहावीच्या गुणाच्या आधारावरच अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जाणार असून यासाठी विद्यार्थ्यांना दहावी 2025 मध्ये विज्ञान आणि गणित मध्ये 60 गुण आणि टक्केवारी 60% असने आवश्यक असून विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून 2008 ते 31 जुलै 2010 दरम्यान असलेल्या अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर 2025 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालयात आपला प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावे असे आव्हान जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले यांनी केले आहे.



