किनाळा जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदनगरी कार्यक्रम उत्साहात संपन्न

मोरे मनोहर
किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बाल आनंद नगरी हा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम यशस्वी पने दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळेत संपन्न झाला.
या बाल आनंदनगरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांची विक्री व खरेदी शाळेमध्ये केली यावेळी आपलीच चिमुकले मुल आज शाळेत स्वावलंबी जीवनाचे धडे शिकण्यासाठी शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद नगरी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या विविध साहित्य खरेदीसाठ गावातील बरेच शिक्षण प्रेमी नागरिक मुलांचे पालक व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
या आनंदनगरी मधून मुलांना पदार्थ विषयाचे ज्ञान चव खरेदी विक्री नफा तोटा याची माहिती प्रात्यक्षिकातून झाली पाहिजे हाच दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश असताना त्यांच्या या आदेशानुसार किनाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचे ज्ञान आत्मसात व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंदनगरीचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रताप पाटील भत्ते यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी धम्मपाल मोरे, गंगाधरराव मोहिते, मोरे ताई आधी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही आनंदनगरी यशस्वी करण्यासाठी शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर श्री कोकणे सर श्री येळगे सर श्री वाघमारे सर सौ गठ्ठावार मॅडम यांनी अतिशय मेहनत घेतली. मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांनी व सर्व शिक्षकांनी मुलांनी आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला यासोबतच विद्यार्थ्यांना खरेदी विक्री नफा तोटा पदार्थ व पदार्थाची चव पैशांचा हिशोब याविषयी माहिती दिली.



