ताज्या बातम्यानांदेडलोहा

शेतीच्या झालेल्या नुकसानीचा मावेजा जास्तीत जास्त मिळवून देणार ; जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आश्वासन

बालासाहेब शिंदे

मारतळा :- शेतकऱ्यांनी खचून न जाता त्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसान मी जाय मोक्यावर पाहिले असून आजही सर्व पिके पाण्याखाली असल्याने शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाल्याने मी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार असल्याचे मत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सोनखेड सह या भागातील गावांना भेटीदरम्यान शेतकऱ्यांना संवाद साधना. काल दिनांक 25 रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सोनखेड, पिंपरणवाडी, पळशी, भेंडेगाव, शेवडी, या गावाच्या भागातल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले की, शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत मान्य नसून आमच्या शेतीचे 100% नुकसानी बरोबर खरडून गेले आहेत ते पण आपण नजरेने पाहिले, त्यावेळी मंत्र्यांनी मी ही परिस्थिती मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळाली पाहिजे यासाठी मी तत्पर असल्याचे यावेळी मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

त्यांच्या समवेत या भागाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रभारी उपविभागीय अधिकारी कंधार रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरपुरे, नायब तहसीलदार अशोक मोकले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, मंडळ अधिकारी सुगावे, तालुकाप्रमुख अशोक मोरे, सुदामराव मोरे, अशोक गौड, सचिन राठोड, संतोष जाधव, बाबुराव जाधव आधी सह शेतकरी बांधव हजर होते.

भेंडेगाव नदीची खोली कमी असल्याने व नदीला अनेक भागातून येणारे पाणी या नदीत प्रवाह असल्याने या नदीचा प्रवाह जास्त वाढल्याने नदीकाठी शेती दरवर्षी अक्षरशः पाण्याने खडून जात असल्याचे भेंडेगाव येथील सरपंच उदगिरे, खुशाल पाटील आधी गावकऱ्यांनी मंत्री महोदयांना निदर्शनास आणून दिल्याने सदरील नदीचे खोलीकरण करण्यासाठी मी लवकरच उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. भेंडेगाव हे पुनर्वशीत गाव असून सदर गावाची पुनर्वसना च्या यादीत नसण्याचे सांगितल्याने त्यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना पुनर्वशीचे प्रक्रिया पाठवा असे आदेशित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker