ताज्या बातम्यानांदेडबिलोली

मांजरा नदी काठावरील नागणी भागातील पूरस्थितीची उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केली पाहणी

◆तहसीलदार गजानन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांची उपस्थिती ◆नागणी येथील पुलावरून पाणी जात असल्याने नागणी ते खांडगाव रस्ता पुन्हा बंद

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहर व परिसरात गत आठ दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत असल्याने गोदावरी व मांजरा नदीला पूर आला आहे. मांजरा नदी काठावरील नागणी येथील पुलावर यावर्षी सलग चौथ्यांदा पाणी जात असून या मार्गावरील नागणी ते खंडगाव आंतरराज्यीय वाहतूक बंद करण्यात आली आहे. दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी काही वेळा करिता पाणी कमी झाल्याचे चित्र दिसून आले पण दुपारी ३ नंतर मांजरा नदी पात्रात पाणी पातळीत वाढ झाल्याने पुन्हा नागणी ते खंडगाव रस्ता बंद झाला आहे.

सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहाण, ग्राम महसूल अधिकारी पवन ठकरोड, तलाठी भगवान कांबळे, राजच गाडेकर आदींनी दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता पाहणी करून प्रशासनातर्फे गावकऱ्यांना पूरस्थिती बाबत सूचना केल्या.

मांजरा नदी पात्रात पाण्याचा येवा वाढत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाशी संपर्कात राहून सतर्क राहण्याचे आवाहन बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे सुद्धा मांजरा नदीकाठच्या गावातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker