ताज्या बातम्यानांदेडनायगांव

हंबरडा मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेनेची नरसीत बैठक : पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे – भिलवंडे

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. 11 आक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी विराट ‘हंबरडा’ मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या तयारीसाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक दि. 7 आक्टोबर रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी केले आहे.

राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे ऐन सनासुदीच्या काळात शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र सरकार संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदतीचा हात देण्याऐवजी तुटपुंजी मदत देवून संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सरकारने भरीव मदत करावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांच्याच उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे दि. 11 आक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येत असून नायगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक नरसी येथे दि. 7 आक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मा.बबनराव थोरात साहेब संर्पकप्रमुख नांदेड, मा.ज्योतीबा दादा खराटे जिल्हाप्रमुख नांदेड, मा गणेश गिरी उपजिल्हाप्रमुख नांदेड, मा.राजेश लंगडापुरे विधानसभाप्रमुख नांयगाव, मा.रामचंद्र रेड्डी उपजिल्हासंघटक नांदेड, मा.बालाजी माली पाटील विधानसभा उपसंघटक नायगाव यांची उपस्थिती राहणार आहे.

नरसी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला शहर प्रमुख उप शहर प्रमुख तालुकासंघटक, तालुका समन्वयक उप तालुका प्रमुख, संर्कल प्रमुख, उप सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख आजी माजी पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे नायगाव तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker