सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्टचे नांदेडमध्ये स्थलांतर…
प्रशासनाची डोळेझाक ; जिल्हाधिकारी कचेरीसमोर काॅग्रेसचे आमरण उपोषण सुरु…

New Bharat Times नेटवर्क
नांदेड :- सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन नांदेड शहरात महापुरुषांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्ट स्थलांतरित करित प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करित असल्याचा आरोप करुन बेकायदेशीरपणे स्थलांतरीत केलेल्या दोन्ही वाईनमार्टचे परवाने रद्द करण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण व सहकांऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी नांदेड वाईन मार्ट, शॉप व राजकॉर्नर चैतन्य नगर येथे कमल वाईनशॉप स्थलांतर करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याने याबाबत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच, यापूर्वि मोफत दारु वाटप आंदोलनाचा ईशारा दिला होता.

परंतू, प्रशासनाच्या विनंतीनंतर त्याऐवजी कोल्ड्रिंक वाटप आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल घेतलीच नसल्याने जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले व जिल्हाधिकारी कचेरीसमोर दि.६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
यावेळी रत्नाकर जोंधळे, गौतम सिरसाट, बालाजी सिहं ठाकूर, संजय शर्मा, व्यंकट दमकोंडवार,म हेश पाटील आदींची उपोषणास उपस्थिती असून माजी नगरसेवक मुन्तजीब, माजी नगरसेवक शेर आली यांनी या उपोषणास भेट दिली.



