ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आंतरराष्ट्रीय स्मारक आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाचे विधिवत पूजनाचा कार्यक्रम संपन्न

New Bharat Times नेटवर्क

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर येथे उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब व पूज्य भन्तेगण यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाचे विधिवत पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, समुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक साकारत आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्याबाबत संबंधित विभागास अवगत करण्यात आले आहे. पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुतळा विहित वेळेत उभा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker