ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी येथे दहावीची परीक्षा काँपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे सुरू

कुंडलवाडी :- शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीची परीक्षा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल व मिलिंद विद्यालय या दोन केंद्रावर सुरळीतपणे सुरू झाली आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी दि.२० फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पेपरला २७७ परीक्षार्थी परीक्षा दिली असून ०१ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची माहिती केंद्र संचालक एस.डी.कमठाणे यांनी दिली आहे.

मराठी माध्यमाचे २४९ पैकी २४८ विद्यार्थी उपस्थित तर ०१ अनुपस्थित होते व उर्दू माध्यमाचे २९ परीक्षार्थीपैकी २९ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker