ताज्या बातम्यानांदेडनायगांव

टाकळी बु येथे भुगर्भातून आवाज, जमीन हादरली ; मात्र भुकंप विज्ञान केंद्रावर याची नोंद नाही

प्रकाश महिपाळे

नायगाव : तालुक्यातील टाकळी बु. येथे दि. 12 आक्टोबर रोजी सकाळी 11 दुपारी 3 वाजता, सायंकाळी 5 वाजता व रात्री 9 वाजता भुगर्भातून आवाज येवून जमीन हादरल्याची घटना घडली असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. मात्र भुकंप विज्ञान केंद्रावर याची नोंद झाली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

नायगाव तालुक्यातील टाकळी बु. येथे दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले.

तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी.विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार नायगाव यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत.

पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker