ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या नावाबाबत शहरात अफवांचे पीक जोमात ◆ कोणत्याही राजकीय पक्षांची अधिकृत उमेदवारी जाहीर नाही

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिकेचे निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. दि.७ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदान केंद्र जाहीर झाल्यानंतर निवडणूकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सध्या नागरिकांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत विविध पक्षांकडून अनेक नावे चर्चेला चर्चेला जात असून नगराध्यक्ष पदांच्या नावाबाबत शहरात यांची उमेदवारी पक्की झाली. त्यांची उमेदवारी पक्की झाली अशा अफवांचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी अजून जाहीर करण्यात आली नाही. हे विशेष.

कुंडलवाडी शहरात सर्वच राजकीय पक्षांकडून नगरपालिका निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. यातच प्रमुख राजकीय पक्षांकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसतानाही तसेच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसतानाही अनेक जणांची नावे शहरात सध्या चर्चिला जात आहेत. यातच भरीस भर म्हणून काहीजण पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही नाहीत अशांची नावे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे चर्चिले जात आहेत. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील अनेक जण पक्षश्रेष्ठीकडे आपल्यालाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी यासाठी साकडे घातले असून यासाठी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आहेत.

कुंडलवाडी नगरपालिकेचा आगामी नगराध्यक्ष कोण असणार याबाबत मात्र नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या चर्चेमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक जण मलाच उमेदवारी मिळेल या आशेने असले तरी त्यांचे समर्थक व कार्यकर्ते मात्र आमच्या साहेबांची उमेदवारी पक्की झाली आहे. आमचं तिकीट फायनल झाल आहे. अशा अफवांचे पीक सध्या शहरात फिरताना दिसून येत आहेत.

प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाला अजून मोठा कालावधी बाकी असतानाही कार्यकर्ते मात्र आमच्या साहेबाला उमेदवारी मिळाल्याचे सांगत सैराट पणे शहरात फिरताना दिसून येत आहेत. काही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले काही जण शांत, संयम व सहनशीलता तसेच मौन व्रत धारण करून आपल्याला तिकीट कसे मिळेल यावर भर देत आहेत. त्यामुळे आगामी काळातील कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाचा ओपन प्रवर्गातून नगराध्यक्ष कोण होणार याबाबत मात्र शहरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker