ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

पुणे ते नांदेड दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावणार : खा. रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : नांदेड ते पुणे प्रवाशांची नियमितपणे होणारी गर्दी पाहता खा. रवींद्र चव्हाण यांनी नांदेड ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येतांना दिसत असून. ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली असून. डिसेंबर पर्यंत गाडी सुरु होण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रातील पुणे–नांदेड मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे तसेच नांदेडमधील रहिवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. सध्या पुणे–नांदेड प्रवास पूर्ण करण्यास जास्त वेळ लागतो, पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा 550 किमीचा प्रवास फक्त 7 तासांत संपणार आहे. या गाडीला सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक पावले उचलली आहेत.

नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून पाठपुरावा केला होता. त्यांच्या भेटीनंतर रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावाची दखल घेतली असून डिसेंबरपर्यंत गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. असे असतील. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. ही गाडी नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे थांबे घेईल. प्रवाशांसाठी सुविधा खूप उत्तम आहेत. ट्रेनमध्ये एसी चेअर कार, हाय-स्पीड वाय-फाय, आरामदायी सीट्स आणि प्रगत सुरक्षा व्यवस्था असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker