शंकरनगर येथे एकाच वर्षात दुसऱ्यांदा फोडलेल्या एटीएमच्या तपासासाठी चार पथके रवाना

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड- देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले एसबीआय चे एटीएम एका वर्षात दोनदा फोडून चोरटे लाखो रुपये लंपास करण्यात यशस्वी झाले असल्याने या फोडलेल्या एटीएमच्या चोरीचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शामलता सुदाम पानेगावकर यांनी दिले.
सविस्तर माहिती अशी की नांदेड-देगलुर राज्य महामार्गावर शंकरनगर तालुका बिलोली येथे रामतीर्थ पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ असलेले एसबीआयचे एटीएमदि.19 सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चार च्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या फोरविलर गाडी मधून आलेल्या अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम कापून एटीएम मधे असलेली सुमारे 20 लाख 43 हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी एटीएम मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस स्टेशन पासून जवळच असलेले शंकरनगर येथील एसबीआय चे एटीएम दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे पांढऱ्या रंगाच्या फोर व्हीलर मधून आलेल्या चोरट्याने एटीएम जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर प्रथम काळ्या रंगाचे स्प्रे मारून सीसीटीव्ही कॅमेरा बंद केले, नंतर एटीएम च्या बाजूला असलेल्या घरातील व्यक्ती घराबाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घराच्या गेटला बाहेरून दस्तीने बांधून एटीएम मध्ये प्रवेश करून त्यांच्या सोबत घेऊन आलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून एटीएम मधील सुमारे 20 लाख 43 हजार रुपये रक्कम लंपास केलेले असताना या चोरीचा तपास अध्याप लागलेला नसून तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेले एटीएम नव्याने सुरू होताच अवघ्या एकाच वर्षात दुसऱ्यांदा दि.18 ऑक्टोंबर 2025 रोजी शनिवारी सायंकाळी पूर्वीप्रमाणेच याही वेळेस अज्ञात चोरट्याने एटीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक शामलता सुदाम पानेगावकर यांनी दिले.
शंकरनगर येथील टीएम फोडून लाखो रुपये लंपास करण्यात चोरट्यांना दुसऱ्यांदा यश आल्याने या गुन्ह्यातील चोरीचा तपास लागेल का असा प्रश्न अनेक सुज्ञ नागरिकांना पडला असून हे एटीएम फोडल्यानंतर दुसऱ्यांदा चालू करताना या संबंधी स्थानिक पोलिसांना बँक कर्मचाऱ्याकडून कसलीही कल्पना देण्यात आली नसल्याने सदरील एटीएम सुरू कधी झाले हे अनेक लोकांना कळण्या अगोदर दुसऱ्यांदा अज्ञात चोरट्याने सदरील एटीएम फोडल्याने सामान्य व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



