भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी २८ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारीसाठी मागणी करावी…

लक्ष्मण बरगे
नायगांव :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच गटाचे व गणाचे आरक्षण जाहिर झाले असुन भाजप कडून आ.राजेश पवार पुनमताई पवार यांच्या आदेशानुसार ईच्छुक उमेदवाराकडून अर्ज शुक्रवार पासुन मागविण्यात येत आहेत.अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख व बालाजी मद्देवाड यांनी दिली आहे.
नुकतेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाचे व गणाचे आरक्षण जाहीर झाले असून नायगाव तालुक्यात चारही गट महीलासाठी आरक्षित झाले आहेत. या सह पंचायत समितीचे आठ गण असुन प.स.चे सभापती पद ओबीसी महीलासाठी आरक्षित झाले.असुन आरक्षण जाहीर झाल्यापासुन वेगवेगळ्या पक्षाचे इच्छुक उमेदवार गाव भेटी देऊन मतदारांशी चर्चा करत असुन मी निवडून रिंगणात उतरणार असल्याचे सांगत आहेत. येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडून अतितटीची होणार असे चित्र दिसत आहे.
काही दिवसात निवडणूसाठी आचारसंहिता लागणार असुन नायगाव सह मतदार संघात सर्व उमेदवार निवडून आले पाहीजे यासाठी आ.पवार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.काल दि.२४ पासुन आ.राजेश पवार व पुनमताई राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील तीन ही तालुक्यात आ. राजेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढविणा-यां इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यास सुरूवात करण्यात आले.
नायगाव येथील आ.पवार यांच्या कार्यालयात माजी तालुकाध्यक्ष दत्ता पा.ढगे व तालुका सरचिटणीस तिजारे यांच्या कडे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणीचा अर्ज द्यावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष श्रीहरी देशमुख व बालाजी मद्देवाड यांनी केले आहे. येत्या २८ तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.



