विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न…

कुंडलवाडी :- हैद्राबाद मुक्तीसंंग्राम लढ्यातील पहिले हुतात्मे गोविंदराव पानसरे यांच्या अर्जापुर येथील पावन भुमीत स्थापन झालेले हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात काम करून महाविद्यालयाचा नावलौकिक केला. ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना घडवले त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व एकमेकांना प्रेरणा मिळण्यासाठी १९९४ ते २०२५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात दि.२५ आँक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार हे कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राजेश्वरराव उत्तरवार व उदघाटक म्हणून सचिव सुनील बेजगमवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.शुद्धोधन कांबळे, उपप्राचार्य डॉ.गोविंद चौधरी, पर्यवेक्षक प्रा.शुद्धोधन गायकवाड, स्टाफ सेक्रेटरी प्रा.हणमंत मटके, कार्यालय अधिक्षक राजु लाभशेटवार हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते हु.गोविंदराव पानसरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यानंतर महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शाल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी डॉ.काशिनाथ पल्लेवाड, डॉ.नरेश बोधनकर, डॉ. माधव हळदेकर, डॉ.प्रशांत सब्बनवार यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. तसेच प्राचार्य डॉ.शुद्धोधन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत व स्नेह भोजनाने करण्यात आला.
प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.शुद्धोधन गायकवाड यांनी तर अध्यक्षीय समारोप राजेश्वरराव उत्तरवार यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ.गोपाल चौधरी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



