ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शक्ती प्रदर्शन करत प्राचार्य मनोहर तोटरे यांचा भाजपात प्रवेश

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मुखेड येथील शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शेळगाव गौरीचे सरपंच डॉ. मनोहर तोटरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यांच्या भाजपा प्रवेशामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत नरसी सर्कलमधून जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची इच्छुक असलेले तालुक्यातील शेळगाव गौरी येथील सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे यांनी नांदेड येथील विश्रामगृहात आज दि .२७ रोजी सोमवारी सायंकाळी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार राजेश पवार यांच्या हस्ते पक्षात औपचारिक प्रवेश झाला. यावेळी आमदार पवार यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस पुनमताई पवार, सचिनभाऊ साठे, पंडितराव वाघमारे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, तालुका अध्यक्ष श्रीहरी देशमुख नरगंलकर, तालुका अध्यक्ष बालाजी मद्देवाड तसेच नायगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मनोहर तोटरे यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे नायगाव तालुक्यात विशेष नरसी भागात पक्षाची ताकद वाढली आहे.

भाजप पक्ष प्रवेश करतांना प्राचार्य तोटरे यांनी नरसी जिल्हा परिषदेच्या गटातील समर्थक जमवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker