माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनीमय बैठकसंपन्न

मोरे मनोहर
किनाळा :- येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी बिलोली तालुक्यात असलेल्या चार जिल्हा परिषद गटापैकी अटकळी आणि लोहगाव या दोन जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची शंकरनगर येथे 27 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता विचार विनिमय बैठक घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा बाल किल्ला असलेल्या बिलोली तालुक्यात असलेल्या चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणाच्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याच पक्षाचे प्रबळ दावेदार विजयी झाले पाहिजे यासाठी या लोहगाव व अटकळी गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारातून योग्य व सक्षम उमेदवार कोण राहील हे जाणून घेण्यासाठी माजीमंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मधील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये सकाळी बारा वाजता विचार विनिमय बैठक घेतले.
या बैठकीस अटकळी व लोहगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी दादांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठीकडून आपणालाच तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी दादाकडे आपलीच बाजू मांडण्यासाठी अनेक गावातून अनेक कार्यकर्ते जमवले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची व प्रमुख कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून दादांनी अनेकांची मते जाणून घेतले.
या विचार विनिमय बैठकीस बाळासाहेब पाटील खतगावकर, रवि पाटील खतगावकर, आनंदराव बिराजदार, लालु शेठिवार, बळवंत पाटील, संतोष पाटील,व्यंकट नाईनवाड, नागनाथ आनंतवार, सोमनाथ गझलवाड, शिवाजी पाटील डोंगरे, राजु गद्दीगुंडे,भास्कर पाटील जिगळेकर, सदाशिवराव पाटील डाकोरे, गंगाधर आनपलवाड, गंगाधर हाके, भास्कर तरटे, हनुमंत गजले, रमेश शेटकर, बालाजी पा शिनगारे, माधव वाघमारे, हणमंत पाटील तोडे, शेषेराव पाटील रोकडे, मारोती पा.डाकोरे, विठ्ठल पा डाकोरे, दत्तात्रेय जाधव, रावसाहेब पाटील मोहिते, माधव कोकणे, व्यंकटराव पांडवे, बालाजी पाटील भोसले, युवराजपाटील भोसले यासह लोहगाव व अटकळी गटातील व गणातील मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, चेअरमन आदीसह गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादाच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीत दादा कोणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दादा ज्यांना उमेदवारी देतील तोच उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील असा विश्वास कार्यकर्त्यांनी दादांना या घेण्यात आलेल्या विचार विनिमय बैठकीत दिले असल्याने येणाऱ्या काळात दादा कोणाला उमेदवारी देतील याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.



